अवकाळीचा तडाखा बसलेल्या बागलाण तालुक्यांत यंदा दुष्काळ; 8 तालुक्यांचा दुष्काळाशी सामना

0
19

Nashik News | गेल्या वर्षी अतिवृष्टीचा तडाखा सहन केलेल्या तालुक्यांमध्ये यंदा अभूतपूर्व दुष्काळ पडलेला आहे. जून 2022 ते मार्च 2023 या दहा महिन्यांत जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तीन लाख शेतकऱ्यांचे तब्बल 258 कोटींचे नुकसान झाले. याच तालुक्यांतील जनतेला यंदा भीषण अशा पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. दुष्काळग्रस्त तालुके अशी ओळख असलेल्या मालेगाव, चांदवड, नांदगाव, येवला आणि सिन्नर या तालुक्यांमध्ये जूनमध्ये अतिवृष्टी झाली.

Maharashtra | हंगाम सुरू होण्यापूर्वीच मोठा झटका; राज्यातील ४५ साखर कारखाने बंद करण्याचे आदेश

त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्येदेखील सातत्याने पाऊस पडल्याने दीड लाख हेक्टरवरील पिकं आणि फळबागांचे नुकसान झाले. या नुकसानीची नोंद कृषी विभागाकडे असून, त्यानुसार जिल्ह्यातील 38 हजार 348 हेक्टरवरील बागायत क्षेत्राचे नुकसान झाले. 4,322 हेक्टरवरील फळबागांना या पावसाचा फटका बसलेला आहे. अतिवृष्टीमुळे उन्हाळ्यातही शेतजमीन ओलिताखाली राहिली. त्यामुळे उन्हाळ्यात कांदा आणि मक्याचे पीक शेतकऱ्यांना घेता आले. जून 2023 मध्ये पावसाचा अंदाज बघून शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली होती. परंतु, दोन महिन्यांत साधारणत: रिमझिमच पाऊस पडला. ऑगस्ट आणि सप्टेंबर जवळपास कोरडाच गेल्याने शेतकऱ्यांना खरिपाची दुबार पेरणी करावी लागली.

तरीही शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागले नाही. सलग 21 दिवस पावसाचा खंड असलेल्या भागाची कृषी विभागाने पाहणीही केली. त्यात ६० ते १०० टक्के नुकसान झाल्याचे दिसून येते आहे. आता या भागातील शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. पण भविष्यात चारा आणि पाण्याची भीषण टंचाई जाणवू शकते. मालेगाव, नांदगाव, बागलाण, देवळा, कळवण, येवला, चांदवड, सिन्नर या तालुक्यांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

political| भाजपला मोठा धक्का..! बडा नेता कॉंग्रेसच्या वाटेवर…

El Nino च्या प्रभावामुळे राज्यातील पावसाचे प्रमाण वेगलेगळ्या स्वरूपात राहिले. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत कमी प्रमाणात पाऊस झाला. यंदा उष्णतेमुळे पाऊस पडला नाही. परिणामी यंदा थंडीचे दिवस कमी असतील तसेच उन्हाळाही कडक जाणवेल. – श्रीनिवास, हवामानतज्ज्ञ

जून 2022 ते मार्च 2023 पर्यंत झालेले नुकसान कसे ?

  • बाधित शेतकरी : 300082
  • जिरायती क्षेत्र : 109867
  • बागायती क्षेत्र : 38348
  • फळपिके : 4322
  • एकूण : 152538 हेक्टर
  • नुकसान : 258 कोटी 24 लाख 17 हजार

अवकाळीचा तडाखा बसलेले 8 तालुके कोणते ?

मालेगाव, नांदगाव, बागलाण, देवळा, कळवण, येवला, चांदवड, सिन्नर, दिंडोरी.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here