Dr. Rahul Aaher | ‘गोदावरी प्रकल्प होणार ही काळ्या दगडावरची रेघ’; उमराणे येथील सभेत राहुल आहेरांचे आश्वासन

0
16
#image_title

Dr. Rahul Aaher | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे देवळा-चांदवड मतदार संघाचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांची उमराणा येथे जाहीर सभा पार पडली यावेळी त्यांनी गिरनार प्रकल्पावर भाष्य करत जनतेला आश्वासित केले आहे.

Rahul Aaher | राहुल आहेरांनी आघाडी सरकारला घेरलं; पण बंधुंवर बोलणं टाळलं

काय म्हणाले राहुल आहेर? 

यावेळी बोलताना, “मागच्या दोन अडीच वर्षाच्या कालावधीत महायुती सरकार मार्फत जी काही काम झाली. त्याचे मोठ्या प्रमाणातील समाधान या परिसरातील लोकांनी व्यक्त केलं आहे. महायुती सरकारने केलेल्या कामाची पोच पावती आपल्याला प्रत्येक गावात मिळत आहे. आपला शेतकरी, महिला, कष्टकरी बांधव, आदिवासी बांधव तसेच समाजातील सर्व घटकांना आयुष्यात बदल घडवण्यासाठी महायुतीने योजना आणल्या. त्यांना आपण या मतदारसंघात प्रभावीपणे राबविल्या.

दुष्काळी तालुक्याचा कलंक आपल्या कपाळावरून पुसला जाईल देवळ्याला दुष्काळी तालुका म्हणून सर्व लाभ मिळतील हा उद्देश ठेवून बाबांनी देवळा तालुक्याची निर्मिती केली होती. आज रामेश्वर चरणी मी तुम्हाला ग्वाही देतो. ज्याप्रकारे महायुती सरकारने नार पार गिरणार प्रकल्पाला मान्यता दिली आहे. त्यामुळे देवळ्याचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही.” असे म्हटले.

विरोधक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत

पुढे बोलत, “हा काळ संभ्रमाचा काळ असून ही वेळ आपल्यात मतभेद व मनभेद निर्माण करण्याची आहे. राजकारणात सत्याला सत्य म्हणून काही लोकांच्या पोळ्या भाजल्या जात नाहीत आणि म्हणून काही लोक तुमच्याकडे येऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. पण या नार पार गिरणार प्रकल्पाच्या ज्या गोष्टी सांगतोय हे त्रिवार सत्य सूर्यप्रकाशा इतकेच नितळ आहे. ही खूण गाठ आपण मनाशी बांधून घ्यावी.” असे म्हणत नागरिकांना आश्वस्त केले.

Rahul Aaher | ‘दादा’ की ‘नाना’ चर्चेला पूर्णविराम; राहुल आहेरांची चांदवड-देवळा मतदारसंघातून माघार

आचारसंहितेनंतर नार पार प्रकल्प सुरू होईल

तसेच, “2019 पर्यंत हा प्रकल्प केंद्रीय नदीजोड प्रकल्प म्हणून राबवला गेला असून ज्या नेत्यांनी यासाठी प्रयत्न केले तिच्या सर्वांची ही मेहनत आहे. पण 2019 मध्ये महाराष्ट्राच्या तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा गुजरातने आपल्या हक्कापेक्षा अधिक पाण्याची मागणी केली, तेव्हा भविष्यात पैसे द्यावे लागले तरी चालेल. पण हक्काचे पाणी गुजरातला द्यायचे नाही. असं म्हणत हा नारपार प्रकल्प स्वतःच्या खर्चाने करणार हा निर्णय दिला. महाविकास आघाडी या प्रकल्पाच्या मुद्द्यावरून संभ्रम निर्माण करत असून गोदावरी प्रकल्प होणार ही काळ्या दगडावरची रेख आहे. आचारसंहिता संपल्यावर गिरनार प्रकल्पाचे काम सुरू होईल.” असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here