मराठा विद्याप्रसारक समाजाच्या कर्मवीर शांतारामबापू वावरे महाविद्यालय, सिडको, नाशिक येथील रसायनशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमोल काटेगावकर यांचे न्यू ग्रीन सिंथेसीस अँड कॅरॅक्टरायझेशन ऑफ सिल्व्हर नॅनो पार्टीकल्स या विषयावर नवसंशोधन पेटंट नुकतेच प्रकाशित झाले आहे.
सदर संशोधनातून सोप्या पध्दतीने आणि पर्यावरणास्नेही सिल्व्हर नॅनो पार्टीकल्स तयार केले आहे. हे सिल्व्हर पार्टीकल्स तयार करण्यासाठी नैसर्गिक रित्या मिळणारे अस्ट्रागलास गमिफर नावाचे वनस्पतीय एक्स्ट्रॅक्ट प्रथमच वापरण्यात आले आहे.
या सिल्व्हर नॅनो पार्टीकल्सचा वापर विविध समाजपयोगी कामासाठी होणार आहे, विशेषतः वैद्यकीय, अन्नप्रक्रिया, आणि पूरक वैद्यकीय सेवांसाठी आणि इतर ग्राहकपयोगी क्षेत्रातही हे संशोधन उपयुक्त ठरणार आहे. ग्रीन केमिस्ट्रीचे मूल्य योग्य रित्या पाळून या संशोधनाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे समाजपयोगी काम डॉ.अमोल काटेगावकर आणि त्यांच्या सहकारी संशोधकांनी योग्य रित्या पार पाडले आहे. त्यांच्या या संशोधनासाठी मविप्र संस्थेच्या सरचिटणीस मा.नीलिमाताई पवार, कार्यकारिणी सदस्य मा.श्री. नानासाहेब महाले, शिक्षण अधिकारी डॉ. डी. डी. काजळे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ जे. डी.सोनखासकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी सदर संशोधनासाठी अभिनंदन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम