लक्ष विचलित करून अज्ञातांनी ५ लाख लांबविले

0
42

द पॉइंट नाऊ
चोपडा येथील तुमच्या मानेवर मुंग्या आल्या आहे असे सांगून लक्ष विचलीत करून अज्ञात दोन जणांनी पाच लाखांची रोकड ठेवलेली पिशवी घेवून लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चोपड़ा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, केशरलाल मोतीलाल पाटील (वय ४५) रा. गरताड ता. चोपडा जि. जळगाव हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. मंगळवारी ३१ मे रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास ते चोपडा शहरातील एसबीआय बँकेत आले. त्यांनी चेकद्वारे त्यांनी त्यांच्या खात्यातून ५ लाख रूपये काढून त्यांच्याजवळ कापडी पिशवीत ठेवली. पैसे घेवून बँकेच्या बाहेर त्यांच्या दुचाकीजवळ उभे असतांना दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी सांगितले की, तुमच्या मानेवर मुंग्या आहेत असे सांगून केशरलाल पाटील यांना पाण्याचा जग आणला.केशरलाल पाटील हे मानेवर पाणी टाकत केशरलाल पाटील हे मानेवर पाणी टाकत असतांना लक्ष विचलित करून अज्ञातांनी त्यांच्या हातातील ५ लाख रूपयांची पिशवी घेवून दुचाकीवरून पसार झाले. पाच लाख रूपयांची रोकडची पिशवी लंपास केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. परंतू तोपर्यंत दोन्ही भामटे लाखोची रोकड घेवून पसार झाले होते. याप्रकरणी केशरलाल पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपड़ा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे करीत आहे,

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here