नाशिक : नाशिकरोड विभागाला त्रास देणारा दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न महासभेत निकाली काढण्यात आला असून गंगापूर पाठोपाठ दारणा धरण मधून 250 कोटींच्या थेट पाईपलाईन योजनेला महासभेकडून मंजुरी देण्यात आली आहे.
या योजनेसाठीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याचेही निश्चित करण्यात आलेले आहे. दारणा धरण थेट पाईपलाईन योजनेसाठी महापालिकेला केंद्राच्या अमृत दोन अभियाना अंतर्गत प्रकल्प खर्चाच्या एकूण 52.81 टक्के रक्कम अनुदान स्वरुपात मिळणार आहे. उर्वरित रक्कम महापालिकेला स्वनिधीतून खर्च करावी लागणार आहे. त्यामुळे या योजनेसाठी महापालिकेला तांत्रिक मान्यता शुल्क, सल्लागार शुल्कासह सुमारे 125 कोटींचा भार उचलावा लागणार आहे.नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. चेहेडी पंपीग स्टेशनच्या माध्यमातून दारणा नदीपात्रातून पाणी उचलून जलशुध्दीकरण केंद्रामार्फत नाशिकरोड परिसरात पुरवठा केला जातो.
APMC Market बाबत दिले महत्त्वाचे आदेश; शिवसेनेच्या तक्रारीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
या पंपीग स्टेशनच्या अलीकडेच दारणा-वालदेवी नदीचा संगम आहे. वालदेवी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडले जात असल्याने हे सांडपाणी दारणाच्या पाण्यात मिसळते.त्यामुळे चेहडी पंपीग स्टेशनमार्फत नाशिकरोड विभागात दुषित पाणीपुरवठा होत असल्याची गेल्या अनेक वर्षांपासून तक्रार आहे.त्यामुळे चेहडी येथील पंपीग स्टेशनवरून दारणा नदीपात्रातील पाणी उचलणे महापालिकेने बंद केले असून नाशिकरोड विभागाला सध्या गंगापूर धरणातूनच पाणीपुरवठा केला जात आहे.
दारणा धरणातील महापालिकेचे पाणी आरक्षण वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे. नाशिकरोडसाठी दारणा धरण ऐवजी गंगापूर धरणातून अतिरीक्त पाणी पुरवावे लागत असल्यामुळे महापालिकेला दुप्पट दराने जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टी भरावी लागत होती.यातून मार्ग काढण्यासाठी केंद्राच्या अमृत दोन अभियाना अंतर्गत दारणा धरणातून थेट जलवाहिनी टाकण्याची योजना राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भातील 250 कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला महासभेत गुरूवारी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम