Dindori Loksabha Voting | दिंडोरी आघाडीवर; ‘या’ तालुक्यांमध्ये सर्वाधिक मतदान

0
28
Vidhansabha Election
Vidhansabha Election

Dindori Loksabha Voting | राज्यात आज शेवटच्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडत असून, यात दिंडोरी लोकसभा मतदार संघ आघाडीवर आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघात आज सर्वाधिक मतदान झाले आहे. कांदा प्रश्नामुळे दिंडोरी मतदार संघाची निवडणूक ही चांगलीच चर्चेत होती. येथे भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे अशी लढत आहे. तर, दुपारी तीन वाजेपर्यंत दिंडोरी लोकसभा मतदार संघात ४५.९५% इतके मतदान झाले आहे. गेल्या वर्ष भरापसून कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहेत. त्यांची नाराजी या निवडणुकीत मतपेटीत उतरणार असल्याचे बोलले जात होते.

दरम्यान, आज मतदानाच्या दिवशीही ही नाराजी दिसून आली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घाऊन मतदान झाले. दुपारी एक वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी समोर आली असून, यानुसार पुढीलप्रमाणे विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची नोंद झाली आहे. (Dindori Loksabha Voting)

विधानसभा मतदार संघनिहाय आकडेवारी – 

  1. नांदगाव विधानसभा मतदारसंघ –  ४१.८८ %
  2. कळवण विधानसभा मतदारसंघ – ५३.८४ %
  3. चांदवड विधानसभा मतदारसंघ – ४७.५७ %
  4. येवला विधानसभा मतदारसंघ – ४०.६७ %
  5. निफाडमध्ये विधानसभा मतदारसंघ – ४४.३७ %
  6. दिंडोरी विधानसभा मतदारसंघ – ४८.०२ % (Dindori Loksabha Voting)

Dindori Loksabha Voting | राज्यात दिंडोरीत सर्वाधिक मतदान 

आज राज्यात शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया असून, राज्यात १३ जागांवर आज मतदान होत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत झालेल्या मतदानानुसार दिंडोरी लोकसभा मतदार संघात सर्वाधिक असे ४५.९५% टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. (Dindori Loksabha Voting)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here