Dindori Lok Sabha | मालेगावात मतदानावर बहिष्कार; निफाडमध्ये टोमॅटो, कांदा माळ घालुन मतदान

0
37
Dindori Lok Sabha
Dindori Lok Sabha

Dindori Lok Sabha |  आज उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, दिंडोरी, या महत्त्वाच्या मतदार संघासाठी पाचव्या आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. नाशिकमध्ये महायुतीचे हेमंत गोडसे, मविआचे राजाभाऊ वाजे आणि पक्ष शांतिगिरी महाराज यांच्यात तिरंगी लढत आहे. तर वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने धुळ्यात महायुतीचे सुभाष भामरे आणि कॉंग्रेसच्या शोभा बच्छा यांच्यात दुरंगी लढत रंगणार आहे. दिंडोरीत महायुतीच्या भारती पवार, मविआचे भास्कर भगरे यांच्यात दुरंगी लढत रंगणार आहे. (Dindori Lok Sabha)

Dindori Lok Sabha | गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार

दरम्यान, दिंडोरी मतदार संघात कांदा प्रश्नामुळे हि लढत चर्चेत आली असून, यामुळे ही लढत अटीतटीची असणार आहे. मतदान सुरळीत पार पडत असतानाच आता दिंडोरी लोकसभा मतदार संघातून मोठी बातमी समोर आली असून, मालेगाव येथील मेहुणे गावातील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावातील पाणी प्रश्नावर अद्यापही तोडगा काढण्यात न आल्याने येथील आक्रमक ग्रामस्थांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. गावातील तिन्ही मतदान केंद्रावर अजूनही मतदान झालेले नाही. (Dindori Lok Sabha)

Bharti Pawar | खर्चात भारती पवारांचीच आघाडी; निवडणुकीवर आतापर्यंत इतका खर्च..?

निफाडमध्ये टोमॅटो आणि कांद्याच्या माळा घालून मतदान

तर, दुसरीकडे निफाडमध्ये संतप्त कांदा आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी गळ्यात टोमॅटो आणि कांद्याच्या माळा घालून मतदान केले आहे. निफाडच्या नैताळे येथे हा प्रकार घडला आहे. गेल्या वर्षभरापासून कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी संतप्त आहेत. तर, शेतकऱ्यांचा हा रोष मतपेटीत उतरणार हे स्पष्ट होते.(Dindori Lok Sabha)

पंतप्रधानांच्या सभेच्या दिवशीही लासलगावात शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून निषेध व्यक्त केला होता. तर, सभेतही संतप्त तरुण शेतकऱ्याने कांदा प्रश्नावर बोला अशा घोषणाबाजी केली होती. त्यामुळे एकूणच दिंडोरी लोकसभेची ही निवडणूक कांदा प्रश्नाभोवती फिरत असून, कांदा निर्यात बंदीच्या मुद्यामुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. त्यामुळे आता कांदा कोणाचा वांदा करणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Bharti Pawar | बहिणीवरचा राग नंतर काढा, कामांची यादीही वाचली; भारती पवारांची भावनिक साद


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here