Dindori Lok Sabha Result | दिंडोरी लोकसभा मतदार संघात पहिल्या फेरी अंती महायुतीच्या विद्यमान खासदार भारती पवार या ५०० मतांनी आघाडीवर होत्या. मात्र, आता दुसऱ्या फेरीत भास्कर भगरे यांनी आघाडी घेतली. भारती पवार यांना मोठा धक्का बसला देत भास्कर भगरे यांनी ६,००० मतांनी पुढे आहेत. आतापर्यंत भास्कर भगरे यांना ३६, २९१ मतं मिळाली असून, भारती पवार यांना ३०,१७१ मतं मिळाली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भारती पवार यांना भास्कर भगरे यांनी ६,१२० मतांनी मागे टाकले आहे. Dindori Lok Sabha Result
Dindori Lok Sabha Result | कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा भारती पवारांना मोठा धक्का
Nashik Lok Sabha Result | राजाभाऊ वाजेंची विक्रमी आघाडी; गोडसेंची हॅट्रिक धोक्यात
कांद्याचा प्रश्न या मतदार संघात निर्णायक ठरल्याने शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांना मोठा फायदा झाला. भारती पवार यांना भाजपने दुसऱ्यांदा संधी दिली मात्र जनतेने आणि विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांना मोठा धक्का दिला आहे. मोठ्या फरकाने भारती पवार या पिछाडीवर आहेत. उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठी पसंती मिळत असल्याचे दिसत असून, नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, या ठिकाणी महाविकास आघाडी आघाडीवर आहे. Dindori Lok Sabha Result
Dindori Lok Sabha Result | दिंडोरीत तुतारी वाजतेय; कांद्याने भाजप उमेदवाराचा वांदा केला..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम