Dindori Lok Sabha | आता राष्ट्रवादीने माघार घ्यावी; गावितांनी भरला उमेदवारी अर्ज

0
36
Vidhan Sabha Election
Vidhan Sabha Election

Dindori Lok Sabha |  दिंडोरीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र स्पष्ट आहे. सकाळीच आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केलेल्या माकपच्या जे पी गावीत यांनी आता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दिंडोरीची जागा माकपला द्यावी, यासाठी ते आग्रही होते. यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेटही घेतली होती. मात्र, तरीही शरद पवारांनी गावीत यांना डावलून भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली.(Dindori Lok Sabha)

यामुळे नाराज असलेल्या गवितांनी गेल्या आठवड्यात महाविकास आघाडीच्या विरोधात रणशिंग फुंकत शरद पवारांना थेट इशारा दिला होता. यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे त्यांची मनधरणी करण्यासाठी दिंडोरीत आले होते. मात्र, यात त्यांना अपयश आले असून, आज जे पी गावीत यांनी आपला आउमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (Dindori Lok Sabha)

Dindori Lok Sabha | जयंत पाटलांना अपयश; गावित आज उमेदवारी अर्ज दाखल करणार 

Dindori Lok Sabha | आता काहीही झालं तरी माघार नाही

दरम्यान, यावेळी जे पी गावित म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जागावाटपाच्या चर्चेत आम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे आम्ही स्वतंत्र उमेदवारी करत आहोत. आमची उमेदवारी ही इंडिया आघाडीकडूनच असून, आता आम्ही माघार घेणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घ्यावी.(Dindori Lok Sabha)

कारण आता आम्ही किती दिवस इतरांच्या पालख्या व्हायच्या. राज्यभरात आमचेदेखील 10 लाख मतदार आहेत. तेही आघाडीलाच मतदान करतील. दिंडोरीची जागा ही माकपला द्यावी आणि राष्ट्रवादीने बाकी नऊ जागांवर लक्ष द्यावे, कारण ही जागा आता आम्हीच लढवणार. आणि आता काहीही झाले तरी आम्ही माघार घेणार नाही. आम्हाला विजयाची खात्री” असल्याचा विश्वास गावीत यांनी एवली व्यक्त केला. (Dindori Lok Sabha)

Bharati Pawar | टक्केवारीची मागणी, धमकी; भारती पवारांवर कार्यकर्त्यांचे गंभीर आरोप..?

मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित 

दरम्यान, माकपचे माजी आमदार आणि आदिवासी नेते जे पी गावीत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाशिकच्या रस्त्यावर पुन्हा एकदा लाल वादळ उतरले. काही दिवसांपूर्वी ज्या नाशिक जजीलहादहिकरी कार्यालयासमोरील रस्त्यावर आदिवासी समाजाने आणि शेतकरी, कामगार वर्गाने ठिय्या आंदोलन केले होते. त्याच ठिकाणाहून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात गावित यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने याठिकाणी उपस्थित होते. (Dindori Lok Sabha)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here