Dindori | दिंडोरीत दोन सर अन् दोन तुतारी; योगायोग की राजकीय डाव..? 

0
36
Dindori Lok Sabha Result
Dindori Lok Sabha Result

वैभव पगार – म्हेळूस्के |  काल देशात लोकसभा निवडणुकीचे तिसऱ्या टप्प्याचे मदान पार पडले असून, काल राज्यात हायव्हॉल्टेज ड्रामा बघायला मिळाला. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघांमध्ये शेवटच्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार असून, त्याआधी मतदार संघातही अनेक घडामोडी पाहायला मिळत असून, यामुळे निवडणूकीला चांगलीच रंगत आलेली आहे.

दरम्यान, दिंडोरी लोकसभा मतदार संघात चौरंगी लढत होईल, असे सुरुवातीला दिसत होते. मात्र, एनवेळी माकपचे माजी आमदार जे. पी. गावित आणि भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी माघार घेतल्यामुळे आता भाजपच्या विद्यमान खासदार डॉ.भारती पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यात होणार आहे.

Dindori | अपक्ष उमेदवाराला तुतारी आणि सर 

नुकतेच सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप झाले आहे. मात्र यात दिंडोरी लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार बाबु सदू भगरे यांना तुतारी निशाणी देण्यात आली असून, त्यांच्या नावापुढेही ‘सर’ लावण्यात आले आहे. यामुळे सध्या हा मतदार संघात चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे पेशाने शिक्षक असून ते मतदार संघात ‘भगरे सर’ म्हणूनच परिचित आहेत.

Bharti Pawar | भारती पवारांची सभा उधळली..?; कांदा उत्पादकांसह गावकरी आक्रमक

निव्वळ योगायोग की राजकीय खेळी..?

परंतु प्रसिद्ध झालेल्या ७(अ) या यादीमध्ये त्यांची निशाणी ही ‘तुतारी वाजवणारा माणूस’ अशी असून, त्यांच्या नावासमोर ‘सर’ लिहलेले नाही. मात्र त्यांचेच आडनाव साधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार बाबू सदू भगरे यांच्या नावापुढे ‘सर’ लिहलेले आहे आणि या उमेदवाराची निशाणी देखील ‘तुतारी’ हीच आहे. हेच मतदानावेळी ईव्हीएम मशीन वरतीदेखील  असणार आहे. यामुळे आता भगरे हे आडनाव आणि तुतारी हे चिन्ह सारखे असणे आणि नावापुढेही सर लिहणे हा निव्वळ योगायोग आहे की विरोधकांची काही राजकीय खेळी..? याबाबत मतदार संघात आणि सोशल मिडियावरही तर्क वितर्क लावले जात आहेत.

BJP | भारती पवारांवर आरोप करणाऱ्या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here