Dindori | दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९९ टक्के

0
16
Dindori
Dindori

वैभव पगार – प्रतिनिधी : दिंडोरी | महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एचएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९९ टक्के लागला आहे. सर्व विभागातून एकूण 858 पैकी 849 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतून 305 विद्यार्थी प्रविष्ट होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विज्ञान विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे.

तर, कला शाखेतून 190 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यापैकी 186 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून कला विभागाचा निकाल 89.24 टक्के लागला आहे. वाणिज्य विभागातून 307 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यात 304 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून वाणिज्य विभागाचा निकाल 98.35 इतका लागला आहे. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेत 56 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 54 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या विभागाचा निकाल 94.44टक्के इतका लागला आहे.

Dindori Loksabha Voting | दिंडोरी आघाडीवर; ‘या’ तालुक्यांमध्ये सर्वाधिक मतदान

यात  प्रथम- पेलमहाले प्रवीण सोमनाथ (विज्ञान – 87.67%) द्वितीय- घरत गायत्री मंगेश (वाणिज्य- 87.17 %) तृतीय-शिंदे दीक्षा निवृत्ती (वाणिज्य – 87%) चतुर्थ -सोमवंशी गौरी संतोष (वाणिज्य -85.83%) पाचवा – पिंगळ स्वप्नाली नंदकिशोर (वाणिज्य -85.67%) गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्य रमेश वडजे, उपप्राचार्य उत्तम भरसठ, पर्यवेक्षक श्रीमती प्रतिभा मापारी, श्रीमती सविता शिंदे, रावसाहेब उशीर सर्व कॉलेज विभाग प्रमुख व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

Maharashtra HSC 12 Results | राज्यात बारावीचा निकाल ९३.३७ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी

यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सर्व पदाधिकारी, दिंडोरी पेठ तालुका कार्यकारी संचालक प्रवीण जाधव, शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, डॉ. नितीन जाधव, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रय जाधव, प्राचार्य रमेश वडजे व शालेय समितीचे जेष्ठ सदस्य, सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक, शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here