दिंडोरीत पुन्हा भुकंपाचे हादरे ? नागरिक धास्तावले

0
30

दिंडोरी: गेल्या आठवड्यात जी घटना घडली तीच पुनरावृत्ती आज घडली आहे. दिंडोरी परिसरात भूकंप सदृश्य धक्के बसत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. रात्री १० वा.६ मि. तसेच १० वा. १५ मिनिटांनी धक्का बसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सलग दोन वेळा हा प्रकार घडल्याने नागरिकांना रात्री झोप नसल्याचे स्थानिकांनी सांगितले

नागरिक अतिशय भयभीत झाले असून येणार्‍या काळात काही गंभीर घटना उद्भवण्यापूर्वी संबंधित विभागाने याबाबत पाऊले उचलण्याची मागणी स्थानिक करत आहेत.

दिंडोरी शहर, मडकीजांब, हातनोरे, निळवंडी, जांबुटके, उमराळे (बु), तळेगाव दिंडोरी आदी गावांमध्ये १६ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास आकाशात काहीतरी आवाज होऊन जमिनीला हादरे बसले होते. त्यावेळी प्रशासनाच्या वतीने नागरीकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र पुन्हा घटना घडल्याने नागरिक घाबरले आहेत.

आज रविवार २१ ऑगस्ट रोजी रात्री १० वा ६ मि. व १० वा. १५ मिनिटांनी पुन्हा जमिनीला हादरा बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

येणार्‍या काळात काही खबरदारी घेण्याची आवश्यकता असेल तर त्याबाबत मार्गदर्शन संबंधित विभागाने करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केल आहे. एकुणच दिंडोरी शहरासह परिसरातील गावातील नागरिक भूकंपाच्या धक्काच्या दहशतीखाली असून सोशल मीडियावर मोठ्या भूकंपाची भीती व्यक्त करतांना नागरिक दिसत आहेत.

सदर जमिनीला बसलेले धक्के हे भुकंपाचेच की अजून कसले या बाबत अद्याप पर्यंत नाशिक वेध शाळेकडून कुठलाही दुजोरा मिळालेला नाही.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here