वैभव पगार
म्हेळूस्के : दिंडोरी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत असून नदी -नाल्याना पूर आला आहे. पालखेड धरणातून ६९२० क्यु. ने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून कादवा नदीपात्रालगतील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे .

तसेच तालुक्यातील करंजवन, ओझरखेड, वाघाड, पुणेगाव, तिसगाव ह्या धरणांच्या ही पाणी साठ्यात वाढ झाली आहे . काही ठिकाणी रस्त्यांवरून ही पाणी वाहत आहे . सध्या होत असलेला पाऊस समाधानकारक असला तरी वर्तविण्यात आलेल्या अंदाजा नुसार हा पाऊस असाच सुरू राहिला तर गहू, सोयाबीन, द्राक्ष ,टोमॅटो ,कोबी आशा पिकांमद्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलार आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम