Crime News | तरुणांची दादागिरी ही दिवसेंदिवस वाढतच आहे. कल्याणमधील अडवली ढोकळी परिसरात मोदी किराणा आणि जनरल स्टोअर्स या किराणा दुकानाच्या मालकाने माल उधार देण्यास नकार दिला. आणि याचाच राग धरत काही तरुणांनी दुकानाची तोडफोड करत दुकान चालकांना जबर मारहाण केली. फक्त मारहाण करूनच शांत बसले नाही तर, दगडफेकही केली आहे. डोंबिवली मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत घटनेचा तपास सुरू केला आहे.
मोदी किराणा दुकानात गौतम उर्फ भोला सिंग ,अभिषेक गुप्ता, गोलू आणि अशु नावाचे चार तरुण ह्या दुकानात किराणा सामान घेण्यासाठी आले होते. मात्र, सामान घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी सामान उधारीवर मागितले. यावेळी दुकानात असलेल्या महिला कुसुम महेश सिंग यांनी उधार सामान देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने तरुणांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
मराठा आरक्षण | देवळातील तिसगांव येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरु
सुरू असलेला हा वाद ऐकून घरात असलेल्या महिलेची मुलगी आणि दीर दुकानात आले आणि त्यांनी तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण, संतप्त तरुणांनी या तिघांना मारहाण सुरू केली. इतकेच, नाही तर दुकानावर दगडफेक करून दुकान फोडलं. महिला, तिची मुलगी व दिरावरही दगडफेक केली. अर्धा तास हा सर्व प्रकार सुरू होता.
अर्धा तासानंतर त्यांनी स्वतःचा बचाव करत मानपाडा पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगितला. दारमीन, पोलिस पुढील तपास सुरू केला आहे. आरोपींच्या हल्ल्यात तक्रारदार हे अत्यंत जखमी झाले आहेत. मात्र, ह्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
Big News | महाराष्ट्र जलसंपदा विभागात तब्बल 4497 पदांसाठी भरती जाहीर
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम