Crime news | माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या कुटुंबीयांच्या महात्मा गांधी विद्यामंदिर तसेच आदिवासी सेवा समिती या दोन्ही शिक्षण संस्थेतील संचालक मंडळासह शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात सर्वांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाकडे त्यांनी अर्ज सादर केलेला होता.
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित माध्यमिक शाळांमध्ये २२ शिक्षक, १२ शिपाई आणि सहा लिपिकांसाठी सन २०२० मध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती.
Crime news | अपघातातील मृत भिकारी निघाला लखपती
राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील शिक्षकांसह इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही बेकायदेशीर असल्याची लेखी तक्रार नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी १७ जानेवारी २०२३ रोजी शालेय शिक्षण विभागाकडे केलेली होती.
यासंदर्भात नाशिकच्या भद्रकाली पोलिस ठाण्यात संस्थाचालकांसह माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, आता या प्रकरणातील ६६ व्यक्तींना अटकपूर्व जामीन मिळाल्याचे समजले आहे.
धक्कादायक! तरुणाला घरी बोलवून नग्न नाचवलं; अश्लील व्हिडिओ शूट करुन केला व्हायरल
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम