Nashik News | नाशिक जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया पार पडत असून, आता ह्या निवडणुकांदरम्यान इगतपुरी तालुक्यात राडा झाल्याचे बघायला मिळाले. इगतपुरी तालुक्यातील धारगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, आता याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकींसाठी आज मतदानाला सुरवात झाली असून, अर्ज माघारीनंतर प्रत्यक्ष ४३ ग्रामपंचायतींमधील सदस्य पदांच्या २०० जागांसाठी तर, ४४ ठिकाणी सरपंच पदासाठी ही लढत सुरू आहे. दरम्यान, ईगतपुरी तालुक्यातील धारगाव ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान हाणामारीचा प्रकार घडला आहे. रात्री उशिरा धारगाव ग्रामपंचायतच्या दोन महिला उमेदवारांचे पती व समर्थकांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धारगावमध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील पुन्हा करणार राज्याचा दौरा; जरांगेंचा मेगा प्लॅन आला समोर
ईगतपुरी तालुक्यातील १५ गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तर तालुक्यातील धारगांव येथील ९ जागांपैकी ७ जागा बिनविरोध झाल्या असुन २ उमेदवार निवडणुक लढवणार आहेत. या गावात रात्री उशिरा हाणामारीची घटना घडल्याने खळबळ उडाली. सध्या गावात शांतता असून, पोलिसांच्या उपस्थितीत याठिकाणी मतदान सुरु आहे.
नाशिक जिल्ह्यात आज मतदान
नाशिक जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच १५ ग्रामपंचायतींतील सरपंच व सदस्यांच्या १८ जागांसाठी प्रचाराचा धुरळा शुक्रवारी थंडावला. जिल्ह्यामध्ये ४८ ग्रामपंचायतींत सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम सुरू आहे. याव्यतिरिक्त १६ ग्रामपंचायतींमधील सदस्यांसाठीच्या १५ तसेच सरपंचाच्या ३ अशा एकुण १८ जागांकरीता पोटनिवडणूका होणार आहे. यासर्व ठिकाणी रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान पार पडत आहेत .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम