Dhule Lok Sabha | धुळ्यातील ‘या’ उमेदवाराचा उमेदवारी अर्ज झाला बाद

0
84
Dhule Lok Sabha
Dhule Lok Sabha

Dhule Lok Sabha |  सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांची चुरस सुरू आहे. अशातच धुळे लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. धुळे लोकसभेत महायुतीने भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamare) यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे. तर, नाराजी नाट्यानंतर महाविकास आघाडीकडून काँग्रेसने माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव (Shobha Bachhav) यांना उमेदवारी दिली आहे. तर, वंचितकडून सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र आज अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज हा छाननीअंती बाद करण्यात आला आहे. (Dhule Lok Sabha)

धुळे लोकसभा मतदारसंघात (Dhule Lok Sabha) अडीच लाखापेक्षाही जास्त मुस्लिम समाजाचे मतदार आहेत. हे लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीने धुळे लोकसभा मतदारसंघात अब्दुल रहमान उमेदवारी देण्यात आली होती. अब्दुल रहमान हे एक उच्चशिक्षित आणि सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी राहिलेले उमेदवार होते. त्यामुळे ते महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर एक तगडे आव्हान होते. मात्र, आता धुळ्यातून वंचितला मोठा धक्का बसला असून, रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. (Dhule Lok Sabha)

Dhule Lok Sabha | काँग्रेसला बालेकिल्ला मिळणार की सुभाष भामरे हॅटट्रिक करणार..? 

Dhule Lok Sabha | उमेदवारी अर्ज का झाला बाद 

धुळे लोकसभा मतदारसंघात वंचितने मैदणात उतरवलेले उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज आज छाननीअंती बाद करण्यात आला आहे. शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होण्याचा न्यायप्रविष्ठ असलेला निर्णय पूर्ण न झाल्यामुळे निवडणूक आयोगाने अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला आहे. तर, निवडणूक आयोगाच्या या (Election Commission) निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचे अब्दुल रहमान यांनी सांगितले आहे. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशपत्र दाखल करण्याचा काल अखेरचा दिवस होता. त्यामुळे आता उच्च न्यायालयात याबाबत काय निर्णय होणार? हे पहावे लागणार आहे. (Dhule Lok Sabha)

Dhule Lok Sabha | धुळ्यात उमेदवार जाहीर होताच, जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

कोण आहेत वंचितचे उमेदवार अब्दुल रेहमान?

अब्दुल रहमान हे धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होते आणि ते आता पोलीस महानिरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. राज्य सरकार व केंद्र सरकारच्या वतीने त्यांना सेवाकाळात अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले आहे. दरम्यान, ‘सुधारित नागरिकत्व’ या कायद्याला विरोध करण्यासाठी आपण राजकारणात येत असून, हाच आपला मुख्य अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांना वंचितने धुळे लोकसभेतून उमेदवारी इळी होती. मात्र, आता त्यांचा उमेदवारी अर्ज हा निवडणूक आयोगाने बाद केला आहे. (Dhule Lok Sabha)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here