Dhule Lok Sabha Result | धुळे लोकसभा मतदार संघात भाजपने विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली असून, त्यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांचे आव्हान आहे. धुळे लोकसभा हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, गेल्या दोन टर्मपासून येथे भाजपचे उमेदवार सुभाष भामरे हे निवडून आले आहेत. मात्र, सध्या धुळ्यात वातावरण त्यांच्या विरोधात असल्याचा फायदा कॉंग्रेसला होताना दिसत असून, शोभा बच्छाव या आघाडीवर आहेत. (Dhule Lok Sabha Result)
Dhule Lok Sabha Result | कॉंग्रेसला त्यांचा बालेकिल्ला परत मिळणार..?
११ व्या फेरीत १८,८५९ मतांची आघाडी घेत शोभा बच्छाव यांनी सुभाष भामरे यांना धोबीपछाड दिली आहे. शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला त्यांच्याच पक्षातून विरोध होत असून, त्या बाहेरच्या उमेदवार असल्याची टीकाही त्यांच्यावर करण्यात आली होती. तसेच त्यांना उमेदवारी दिल्याने कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनीही राजीनामा देत कॉंग्रेसची साथ सोडली.
Share Market | शेअर बाजारात मोठा भूकंप; आकड्यांचा शेअर बाजारावर मोठा परिणाम
याचा फटका शोभा बच्छाव यांना बसणार असल्याची चर्चा सुरू होत्या. मात्र, सध्या त्या आघाडीवर असून, धुळ्यात कॉंग्रेसला त्यांचा बालेकिल्ला परत मिळणार..? की भाजपचे सुभाष भामरे हॅट्रिक करणार..? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. तर, अकराव्या फेरीत ४,१०,६६९ मतं भामरेंना मिळाली असून, ४,२३,७३७ मतं शोभा बच्छाव यांना मिळाली आहेत. (Dhule Lok Sabha Result)
Nashik Lok Sabha Result | नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने गुलाल उधळला
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम