Dhule : तब्बल 20 दुचाकींसह दोघे चोरटे धुळे पोलिसांच्या ताब्यात

0
11

Dhule : धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरसह परिसरातून दुचाकी चोरून नेणाऱ्या दोघा भामट्यांना अटक करण्यात पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या शोध पथकास यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी २० मोटारसायकली जप्त केल्या आहेत. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी धुळे जिल्हयात इतर पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी वाहन चोरीचे प्रकार होत असल्याने प्रतिबंध होणेसाठी प्रभावी उपाययोजना आखून कारवाई व्हावी विशेष सुचना दिल्या होत्या. त्यानुसार अप्पर पोलीस अधिक्षक, उप विभागीय पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस ठाणे परिसरात पोलीस शोध पथक कार्यान्वीत करण्यात आले होते.

पिंपळनेर पोलीस ठाणेचे पोकॉ राकेश बोरसे यांना मो.सा. चोरी करणाऱ्या इसमांबाबत माहिती मिळाली होती. सदर माहीतीची पुष्टी करणेसाठी सपोनि श्रीकृष्ण पारधी यांनी सुत्रे हाती घेतली व पथक तयार करून सापळा रचुन शामील पांडु बागुल (वय २१, रा. शेंदवड, ता. साक्री) यास शिताफिने ताब्यात घेतले. सदर चोरास विचारपुस करता त्याने त्याचा साथीदार रोशन सुरेश गायकवाड ( वय २३, रा. विरगांव, ता.बागलाण जि. नाशिक) याचे सोबत दि. १८ एप्रिल रोजी देशशिरवाडे येथून तक्रारदार यांचे घराचे अंगणातून तसेच दि. २१ जून रोजी बोपखेल गावातून तक्रारदारांचे घराजवळुन मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली.

तसेच दिघावे येथून देखील मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. याशिवाय नाशिक जिल्हयातील छावणी, मालेगाव कॅम्प, वडनेर ठाकुर्डी, सटाणा परिसरातील देखील जवळपास २० मो.सा. चोरी केल्याची कबुली दिली. त्यावरुन आरोपी शामील बागुल, रोशन गायकवाड यांचेकडुन २० चोरीस गेलेल्या मो.सा. हस्तगत केल्या आहेत. पिंपळनेर पोलीसांचा अधिक तपास सुरु आहे. या दुचाकींची किंमत ६ लाख पंचवीस हजार इतकी आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here