Dhangar Reservation | सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून आरक्षणाच्या मुद्द्यांनी राज्य सरकारला चांगलंच घेरलं आहे. राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष पाहायला मिळत असतानाच आता धनगर बांधवही आक्रमक झाले आहेत. आज राज्यभरातील धनगर बांधवांनी आंदोलन सुरू केले आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमात या प्रवर्गातून आरक्षण देण्याकरिता शिंदे सरकार जीआर काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Dhangar Reservation | धनगर आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय; सह्याद्री आदितीगृहावरील बैठक संपन्न
नरहरी झिरवळ यांचा राज्य सरकारला इशारा
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून आरक्षण देण्याला अजितदादा गटाचे आमदार नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट विरोध दर्शवत सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याचा अध्यादेश काढल्यास राज्यातील 60 ते 65 आमदार राजीनामा देतील असा इशारा झिरवळांकडून देण्यात आला आहे. “सरकार कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता धनगर आरक्षणाचा जीआर काढण्याच्या तयारीत आहे. तेव्हा आमचा याला विरोध आहे.” असे नरहरी झिरवळांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच “विरोधकांनी धनगर समाजाला आरक्षण देण्यावरून आदिवासी आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली असून या बैठकीत पुढे कोणतीही भूमिका घ्यायची याबाबत चर्चा होणार आहे.” असे देखील झिरवळ यांनी सांगितले. “धनगर आणि धनगड या जाती वेगळ्या असल्याचे सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने स्पष्ट केले असूनही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून धनगर आरक्षणाचा जीआर काढत असून आमचा याला विरोध आहे.” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
Dhangar Strike | धनगर समाजाच्या मागण्यांसंदर्भात आंदोलकांची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
खोसकरांनी देखील दिला राजीनाम्याचा इशारा
त्याचबरोबर धनगर आरक्षणाचा जीआर काढल्यास ‘मी आमदारकीचा राजीनामा देणार’ असल्याची घोषणा काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी केली आहे. “राज्य सरकारच्या चुकीच्या निर्णयाने आमची मुलं रस्त्यावर येतील.” असा आरोप देखील खोसकर यांनी केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम