Nashik Crime | पत्नी आणि सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

0
126
Nashik Crime
Nashik Crime

Nashik Crime | नाशिकच्या गिरणारे भागात पत्नी व सासरच्या नातलकांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाने आपले जीवन संपवले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी आता नाशिक तालुका पोलीस ठाण्यात युवकांच्या पत्नीसह सासरच्या नातलगांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime | उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; मद्य तस्करी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

पत्नीकडून केला जात होता मानसिक छळ

राहुल गणपत थेटे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून राहुल सॉफ्टवेअर इंजिनियर होता. आत्महत्येनंतर राहुल थेटे यांच्या आई सरिता थेटे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राहुलचा विवाह 2021 मध्ये भगूर येथील नंदू हारक यांची मुलगी पल्लवी हिच्यासोबत झाला होता. लग्नानंतर पल्लवी राहुल व त्याच्या घरच्यांना शिवीगाळ करीत वाद घालत होती. त्याचबरोबर राहुलला मारहाण करून माहेरी निघून जायची. राहुलवर खोटे आरोप करून जीवाचे बरे वाईट करेन अशी धमकी द्यायची. दिनांक 15 सप्टेंबर रोजी राहुल व पल्लवी मध्ये वाद झाला त्यावेळी पल्लवीने राहुलला मारहाण करीत शिवीगाळ केली. या त्रासाला कंटाळून राहुलने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर आता पत्नी पल्लवी, सासरे नंदू रामनाथ हारक, सासू अनिता नंदू हारक, मेव्हणा अंकुश नंदू हारक, पल्लवीचा मावस मामा रामदास धांडे, मावस मामी माधुरी रामदास धांडे, यांच्या विरोधात राहुलला आत्मवत्तेस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime | मृतदेहाजवळ पूजा केल्याच्या अघोरी घटनेने नाशकात खळबळ

आत्महत्येपूर्वी राहुलने चिठ्ठी लिहून केले आरोप

राहुलने आत्महत्या करण्यापूर्वी पत्नी आणि सासरच्या नातलगांविरोधात तक्रार असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे. तसेच पल्लवीकडून होणाऱ्या शिवीगाळीचा आणि मारहाणीचा व्हिडिओ देखील काढला असल्याचे सरिता थेटे यांनी फिर्यादीत सांगितले या प्रकरणी आता नाशिक तालुका पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here