Dhangar Strike | धनगर समाजाच्या मागण्यांसंदर्भात आंदोलकांची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

0
32
Eknath Shinde
Eknath Shinde

Dhangar Strike | पंढरपूर येथे मागील सहा दिवसांपासून सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधींचे टिळक स्मारका येथे ‘धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा.’ अशी मागणी करत आमरण उपोषण सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Dhangar reservation | धनगर समाज पुन्हा आक्रमक; अनेक ठिकाणी आंदोलने

शनिवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी शासनाच्या शिष्टमंडळाने उपोषणकारांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सह्याद्री अतिथिगृहावर याबाबत बैठक आयोजित केली असून त्यातून समाधानकारक तोडगा निघेल असे आश्वासन शिष्ट मंडळाकडून देण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराजे देसाई यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राहणार बैठकीला उपस्थित

आजच्या बैठकीसाठी धनगर समाजाचे प्रतिनिधी म्हणून आडवोकेट सुभाष गोफणे, अनिल झोरे, सुभाष मस्के, पंकज देवकते, बिरु कोळेकर, प्रशांत घोडके, आदित्य फत्तेपूरकर आणि विठ्ठल पाटील हे मुंबईला येण्यासाठी रवाना झाले असून या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई, अतुल सावे आणि विजय गावित हे मंत्री देखील उपस्थित असणार आहेत.

Dhangar Reservation | धनगर मोर्चाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक

कायदे तज्ञ देखील बैठकीला उपस्थित राहणार

धनगर समाजाकडून अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा यासाठी मागणी करणारे उपोषण आंदोलन केले जात असून त्या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेत ही बैठक आज तात्काळ आयोजित करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्याचबरोबर या बैठकीचे आयोजन इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे. धनगर समाजाच्या या मागणीमध्ये अनेक कायदेशीर अडचणी असल्याकारणाने बैठकीसाठी शासनाकडून कायदे तज्ञांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here