धामणी विद्यालयात सर्वतीर्थ संस्थानच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप

0
35

राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत धामणी येथील श्री छत्रपती शिवाजी राजे भोसले विद्यालयात शनिवार ता.२८ तीर्थक्षेत्र सर्वतीर्थ टाकेद संस्थांनचे महंत ऍड श्री किशोरदास श्रीवैष्णव यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वही पेन स्वीट चे वाटप करण्यात आले.
सकाळी ठीक ११ वाजता शालेय साहित्य वाटप हा कार्यक्रम शालेय पटांगणात घेण्यात आला.

या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी प्रमुख मान्यवरांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. मान्यवरांचा परिचय करून देत मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. दहावीच्या विद्यार्थीनींनी मंगलमय जय शारदे आम्ही वंदितो तुजला या स्वागतगीताने सुरुवात केली. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपसरपंच नारायण भोसले होते. यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.सूत्रसंचालन शिक्षक संतोष परदेशी यांनी करून देत कार्यक्रमाचे प्रस्ताविक व प्रमुख मान्यवरांचा परिचय करून दिला त्यानंतर सर्वतीर्थ टाकेद संस्थानचे महंत अँड श्रीकिशोरदास श्रीवैष्णव, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राम शिंदे,अँड अमेय श्री किशोरदास श्रीवैष्णव, राजाराम लोहकरे,पुजारी पंडित तिवारी,पत्रकार निलेश काळे यांचा शाळेच्या व धामणी ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

त्यानंतर अँड श्रीकिशोरदास श्रीवैष्णव,सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राम शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर नारायण भोसले यांनी अध्यक्षीय भाषण केले.सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन एस ए परदेशी यांनी केले.कार्यक्रमावेळी अँड श्री किशोरदास श्रीवैष्णव,सरपंच गौतम भोसले, उपसरपंच नारायण भोसले, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राम शिंदे, अँड अमेय श्रीवैष्णव, राजाराम लोहकरे, दशरथ भोसले, पत्रकार निलेश काळे, दिव्यांग बांधव उत्तम भोसले, सागर भोसले, ईश्वर भोसले, राजेंद्र भोसले, बहिरू भोसले, शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र भोसले, ज्ञानेश्वर भोसले, योगेश वाघ, चेतन भोर,मुख्याध्यापक आर बी गुजर,डी एस भोसले, जि पी जाधव, एस पी काळे, एस ई परदेशी, पी एन गोरडे, बी एस टोचे, एन एस कर्पे, ए एस शिंदे, झनकर, डी डी भोसले, व्ही बी बरे, घोटेकर साईनाथ, एस लाड, मुरकुळे अनिता, वाकचौरे विनोद आदि श्री छत्रपती शिवाजी राजे भोसले विद्यालय धामणी चे शिक्षकवृंद विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here