Skip to content

धामणगाव येथे मनसे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न


राम शिंदे | इगतपुरी
तालुक्यातील टाकेद-खेड गटातीतील मनसे कार्यकर्त्यांची मनसे शाखा उद्घाटन दरम्यानची आढावा बैठक नुकतीच धामणगाव येथील हॉटेल युवराज याठिकाणी संपन्न झाली.आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर तसेच पक्ष कार्यकर्त्यांची ग्रामीण भागात एकजूट बांधण्यासाठी मोट तयार करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशान्वये सरचिटणीस रतनकुमार इचम, जिल्हा प्रमुख अंकुश भाऊ पवार, उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील धामणगाव गटातील मनसे कार्यकर्त्यांनी आपापल्या स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची मनसे शाखा ओपनिंग बैठक आयोजित केली.

सायंकाळी आयोजित केलेल्या या बैठकीला राज्याचे मनसे वीज कामगार सरचिटणीस रामनाथ साबळे हे उपस्थित होते त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.या बैठकीत गाव तिथे शाखा आणि वाडी वस्ती तिथे कार्यकर्ता कसा तयार करता येईल या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली.अनेक निष्ठावान मनसे कार्यकर्त्यांनी या बैठकित बोलतांना आपापली मते समस्या अडचणी यावेळी व्यक्त केल्या.यावर सर्वांना मनसेचे वीज कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस रामनाथ साबळे यांनी सर्व मनसैनिकांना अनमोल मार्गदर्शन केले त्यानंतर धामणी येथील शिवसेनेचे युवा कार्यकर्ते अंकुश भोसले यांनी मनसेत असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर पक्ष प्रवेश केला.

याप्रसंगी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन अंकुश भोसले यांचे मनसे पक्ष्यात सन्मान करून स्वागत केले. आगामी काळात मनसे पक्ष वाढीसाठी हिंमतीने एकमताने काम करू स्थानिकांच्या प्रश्नांसाठी न्याय हक्काने लढू असे मत यावेळी अंकुश भोसले यांनी स्पष्ट केले. यावेळी राज्याचे मनसे वीज कामगार सेना सरचिटणीस रामनाथ साबळे, कट्टर निष्ठावान मनसे सैनिक कोंडाजी तातळे, राजेश भोसले, किरण साबळे, मंगेश गाढवे, अशोक गाढवे, गणेश भांगरे, प्रकाश साबळे, विकास साबळे, सुदाम भोसले, राजू भवारी,योगेश साबळे, बळीराम चौरे, विजय गाढवे, माजी सरपंच संतोष साबळे,वसंत तळपाडे, विलास आढाव, तानाजी तळपाडे, अरुण साबळे, नारयन साबळे, नितीन गोडे, प्राणिकेत मुंडे, प्रकाश साबळे, रतन भांगरे, अजय चौरे आदींसह बहुसंख्य मनसे सैनिक यावेळी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!