landslide : मार्कंडेय पर्वतावरील दरड कोसळून भाविक जखमी

0
43

Devotees injured due to landslide सप्तशृंग गडावरील बस घाटातून खाली कोसळल्याच्या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच वणी परिसरात आणखीन एक दुर्घटना घडली आहे. वणी येथील सप्तशृंगी गडालगत असलेल्या मार्कंडेय पर्वतावर दरड कोसळल्याने काही जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. सोमवती अमावस्या निमित्ताने मार्कंडेय पर्वतावर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी बघायला मिळत आहे. यातच पायवाटेचा मार्ग काढत असताना पर्वतावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर ही दरड कोसळली आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मार्कंडेय पर्वतावर दरवर्षी सोमवती अमावस्या निमित्ताने मोठी यात्रा भरते. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील विविध ठिकाणाहून हजारो भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोमवती अमावस्या निमित्ताने मार्कंडीय पर्वतावर मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली.

दरम्यान सकाळी 11 वाजेच्या सुमारास बाबापूर-मुळाणे बारी मार्गे मार्कंडेय पर्वतावर जात असलेल्या पायवाट मार्गावर पर्वताची चढाई करत असताना दोन भाविकांवर जवळपास 100 किलो वजनाचा दगड निखळून पडला. हा दगड अंगावर पडल्याने बाळू गजराम चारुस्कर वय ५७ वर्षे, (राहणार दिंडोरी तळेगाव) आणि अशोक मनोहर गायकवाड वय ५५ वर्ष, (राहणार बोरगड म्हसरुळ, नाशिक) हे दोघे भाविक जखमी झाले आहेत.

 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या भाविकांनी तात्काळ दोन्ही जखमींना उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेमधून वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

 

काही दिवसांपूर्वीच सप्तशृंगी गडावरून खाली उतरत असताना एसटी महामंडळाच्या बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस 300 फूट खोलवर दरीत कोसळल्याची घटना घडली होती. यामध्ये जवळपास 23 भाविक जखमी झाले होते तर एका महिला प्रवासाचा मृत्यू देखील झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात भीतीच वातावरण पसरलेलं असतानाच पुन्हा एकदा दरड कोसळल्याची दुर्घटना घडल्याने वणी परिसरामध्ये खळबळ माजली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here