Deola | नवनिर्वाचित खासदार भगरेंकडून देवळ्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी; मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

0
18
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  रविवारी नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या देवळा तालुक्यातील उमराणे येथे रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वीत्त हानी झाली. या नुकसानग्रस्त भगाची दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी भेट घेतली व नागरिकांचे सांत्वन करत प्रशासकीय यंत्रणेला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.

Deola | देवळा तालुक्यात वीज पडल्यामुळे दोघांचा मृत्यू तर, कांदा शेड्स व घरांचेही नुकसान

देवळा तालुक्यातील उमराणे व परिसरात रविवारी (दि. ९) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे तिसगाव येथील एका वीस वर्षीय तरुणावर वीज पडून त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर, उमराणे येथे कांदा शेड कोसळून एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच वीज पडून एक बैल ठार झाला असून, या परिसरात वाऱ्यामुळे बहुतांश ठिकाणी कांद्याचे शेड कोसळले असून, कांदा भिजून व्यापाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

Dada Bhuse | खचून जाऊ नका सरकार तुमच्यासोबत; तातडीने पंचनामा करण्याचे मंत्री भुसेंचे निर्देश

या घटनास्थळी आज सोमवारी (दि. १०) रोजी दिंडोरीचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे, तालुक्याचे माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी आदींनी याठिकाणी भेट देत झालेल्या नुकसानीची पाहणी करून तहसीलदारांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच वीज कोसळून मृत्यु मुखी पडलेल्या तिसगाव येथील आकाश देवरे (वय २०) व उमराणे येथील कांदा शेड कोसळून देवीदास भाऊराव आहेर (वय 40) यांच्या घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले. त्याच बरोबर आज सकाळी पालकमंत्री दादा भुसे, आमदार डॉ. राहुल आहेर यांनी देखील नुकसानग्रस्त भागास भेट देऊन अपघातग्रस्त नागरिकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here