Skip to content

देवळा पोलीस ठाण्यात पोलीस शहीद दिन साजरा


देवळा : देवळा पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि२१) रोजी पोलीस शहीद दिन साजरा करण्यात आला. तालुक्यातील भूमिपुत्र शहीद सहायक पोलिस उपनिरीक्षक भगतसिंग परदेशी ,लोहोणेर ,पोलीस नाईक बाळू गांगुर्डे ,शेरी ,पोलीस शिपाई संजय भामरे, वाखारी या शहीद झालेल्या भूमिपुत्रांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

देवळा पोलीस ठाण्यात शहीद झालेल्या भूमिपुत्रांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतांना पोलीस निरीक्षक दिलिप लांडगे आदी (छाया -सोमनाथ जगताप )

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शहीद कुटुंबातील सदस्यांचा पोलीस निरीक्षक दिलिप लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलीस निरीक्षक लांडगे यांनी शहीद दिनाचे महत्त्व पटवून सांगितले . याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, विक्रांत कचरे , श्रावण शिंदे, हवालदार रामदास गवळी, पोलिस नाईक भास्कर सोनवणे, रुतीका कुमावत , महीला पोलीस नाईक ज्योती गोसावी, महीला काॅनस्टेबल माधुरी पवार, स्वाती चव्हाण,
आदींसह सर्व पोलीस नाईक ,ठाणे अंमलदार ,हवालदार तसेच इतर कर्मचारी व तालुक्यातील सर्व गाव कामगार पोलीस पाटील तसेच शहीद कुटुंबातील सदस्य उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!