देवळा पंचायत समिती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

0
27
देवळा येथील गटविकास अधिकारी राजेश देशमुख यांना अमृत महाआवास " राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करतांना ग्रामविकास मंत्री ना . गिरीष महाजन,समवेत केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार , आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा : “अमृत महाआवास “अभियान सण २०२२/२३ मध्ये देवळा पंचायत समितीला उत्कृष्ट काम केल्याबद्दल ग्रामविकास मंत्री ना . गिरीष महाजन यांच्या हस्ते राज्य पुरस्कृत आवास योजेतर्गत जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .देवळा पंचायत समितीने अमृत महाआवास अभियान सण २२/२३ मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांची घरकुले पूर्ण करून त्यांना लाभ दिल्याबद्दल देवळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश देशमुख यांचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रक्लप संचालक प्रतिभा संगमनेर यांनी कौतुक केले आहे.

देवळा येथील गटविकास अधिकारी राजेश देशमुख यांना अमृत महाआवास ” राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करतांना ग्रामविकास मंत्री ना . गिरीष महाजन,समवेत केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार , आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

या पुरस्कार प्राप्त पंचायत समितीला १५ ऑगस्ट रोजी ग्रामविकास मंत्री ना . गिरीष महाजन , केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . यावेळी प्रक्लप संचालक प्रतिभा संगमनेर , महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे , मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल ,आमदार सीमा हिरे , सर्व विभाग प्रमुख ,ग्रामसेवक आदी उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here