देवळा येथे छायाचित्रण दिन उत्साहात साजरा


देवळा ; जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त शनिवारी दि १९ रोजी येथे दुर्गा माता मंदिरात तालुका छायाचित्रकार संघटनेच्या वतीने कॅमेऱ्यांचे पूजन करण्यात येऊन छायाचित्रण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

देवळा येथे जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतांना संघटनेचे तालुका अध्यक्ष देवा भामरे ,उपाध्यक्ष रवी खैरनार ,सचिव दिनेश शेवाळे आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

यानिमित्ताने देवळा शहरातून मोटर सायकल रॅली काढून छायाचित्रकारांनी आनंदोत्सव साजरा केला. या रॅलीचा समारोप देवळा शहरातील शिवस्मारकातील अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अभिवादनाने करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी छायाचित्रकार ह भ प अविनाश महाजन , संघटनेचे तालुका अध्यक्ष देवा भामरे ,उपाध्यक्ष रवी खैरनार ,सचिव दिनेश शेवाळे, सुनील निकम ,उद्धव भामरे ,निलेश टर्ले, वैभव शिवदे ,दिनेश सोनार ,योगेश गांगुर्डे, सतीश देवरे, फुला सूर्यवंशी, पप्पू देवरे, निखिल देवरे, राकेश शेवाळे ,रमेश पाचपांडे ,रवी काकुळते ,शरद सूर्यवंशी, नरेंद्र आहेर, पंकज आहेर, मंगेश निकम, सचिन आहिरे, नितीन अहिरे, सुरेश अहिरे, परेश शिवदे, माणिक आहेर ,विकेश बागुल, सागर बकुरे ,भूषण जाधव ,गोलू शिवदे ,रुपेश वाघ, अतुल भामरे ,मनोज देवरे, युवराज भामरे ,संदीप पगारे ,भूषण जाधव ,युवराज भामरे ,नंदु पगार, कुणाल लाडे, राजू आहेर, योगेश देवरे आदी उपस्थित होते . अध्यक्ष देवा भामरे यांनी आभार मानले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!