देवळा : देवळा बस स्थानक परिसरात शौचालय नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली असून , एस टी महामंडळाने याची दखल घेऊन तात्काळ शौचालय बांधून प्रवाशांना दिलासा द्यावा ,अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संतोष शिंदे यांनी देवळा बस स्थानक प्रमुखांना दिले.
निवेदनाचा आशय असा कि , गेल्या दोन तीन वर्षांपासून देवळा येथे नवीन बस स्थानकाचे काम सुरु असून ,ते अद्याप पूर्ण झाले नसल्याने याठिकाणी प्रवशांसाठी शौचालयाची सोय नसल्याने मोठया प्रमाणात गैरसोय निर्माण झाली आहे. सद्या सणासुदीचे दिवस असल्याने बस स्थानकात प्रवाशांची गर्दी देखील वाढली आहे. मात्र या बस्थानकात शौचालय नसल्याने जास्त करून महिला वर्गाची गैरसोय झाली असून, या गंभीर समस्यांमुळे प्रवाशी वर्गात नाराजी पसरली आहे.
याची संबंधित आगर प्रमुखांनी दखल घेऊन तात्काळ शौचालयाची उभारणी करावी . व येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशी वर्गाची होणारी गैरसोय दूर करावी . अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे . निवेदनावर योगेश आहेर , महेंद्र आहेर ,दिलीप आहेर ,सचिन सूर्यवंशी ,यजिद शेख , श्रीकांत अहिरराव , हिरामण आहेर ,साहेबराव आहेर ,सतीश सूर्यवंशी आदींच्या सह्या आहेत .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम