सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | पिंपळगाव (वा.) येथील म.वि.प्र.च्या जनता विद्यालयात शिक्षणप्रेमी कर्मवीर डी.आर. भोसले यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संगीता आहेर होत्या. व्यासपीठावर पर्यवेक्षक भाऊसाहेब निकम, अशोक खैरनार, सुनिता आहेर, वैशाली निकम, चंद्रशेखर चव्हाण उपस्थित होते. अशोक खैरनार यांनी प्रास्ताविक केले.
Deola | ‘गावागावातून मिळणारा प्रतिसाद बघता माझा विजय निश्चित’- केदा आहेरांनी व्यक्त केला विश्वास
बहुजन समाजापर्यंत ज्ञानगंगा पोहोचविण्याचे काम म.वि.प्र. संस्थेने केले
सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख रवींद्र निकम यांनी खेड्यापाड्यात बहुजन समाजापर्यंत ज्ञानगंगा पोहोचविण्याचे काम म.वि.प्र. संस्थेने केले. संस्थेने आपल्या कार्याने फक्त जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रातही आपला नावलौकिक निर्माण केला आहे. संस्थेचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या कार्यास अनेक कर्मवीरांचे योगदान लाभले आहे त्यापैकी एक म्हणजे कर्मवीर डी. आर. भोसले आहेत. त्यांनी शिक्षण प्रसार, स्त्रियांचे शिक्षण, सहकार चळवळ, शेतकऱ्यांचे प्रबोधन, गोरगरीब व गरजूंना सातत्याने मदत अशा विविध प्रकारच्या कार्यामध्ये आयुष्यभर भरीव काम करत समाजसेवा केली.
समाजसेवेचे त्यांचे विचार आणि कार्य हे खूप महान होते.
बहुआयामी व्यक्तिमत्व, अत्यंत दूरदृष्टीने व कल्पकतेने त्यांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. अनेक लोकांना सहकाराचे महत्व पटवून देऊन बहुजन समाजाच्या हितासाठी त्यांनी अनेक सहकारी संस्था स्थापन केल्या. समाजाच्या उन्नतीसाठी खूप काही करण्याची तळमळ त्यांना होती. समाजसेवेचे त्यांचे विचार आणि कार्य हे खूप महान होते. सूत्रसंचालन सरोज जाधव यांनी केले. आभार प्रियंका बच्छाव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम