सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | 118 चांदवड विधानसभा मतदारसंघातून खर्डे ता. देवळा येथील दिगंबर (बाळा) शांताराम जाधव यांना वंचित बहुजन आघाडीकडून पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या महिन्यात चांदवड-देवळा विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली होती. त्यानुसार, राज्य कमिटीकडून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष कपिल (भाऊ) आहिरे व महासचिव संजय जगताप यांनी चांदवड-देवळा मतदारसंघात उमेदवार चाचपणी केली.
जाधव शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार
त्यानुसार, वंचित बहुजन आघाडीने देवळा तालुक्यातील खर्डे येथील पक्षाचे जिल्हा उपाध्यक्षदिगंबर (बाळा) शांताराम जाधव यांना चांदवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे जाधव यांचे मतदारसंघातून आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले असून, जाधव हे लवकर शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम