सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | येथील जिल्हा नेते चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघाचे इच्छुक उमेदवार केदा नाना आहेर यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने देवळा बाजार समितीच्या उपसभापती सह सर्व संचालक मंडळाने काल बुधवार दि. २३ रोजी देवळा येथे आयोजित आहेर समर्थकांच्या सवांद मेळाव्यात राजीनामे सादर करून आपला पाठिंबा दर्शविला.
पदाधिकाऱ्यांनी उगारले राजीनाम्याची अस्त्र
चांदवड मतदारसंघात केदा नाना आहेर हे इच्छुक उमेदवार असून, भाजपने आहेर यांना उमेदवारी दिली नाही. यामुळे देवळा तालुक्यात राजीनामा सत्र सुरू झाले असून, मंगळवारी भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष किशोर चव्हाणांसह अन्य पदाधिकाऱ्यांनीही आपली नाराजी व्यक्त करीत राजीनाम्याचे अस्र उगारल्याने तालुक्यात भाजपाला खिंडार पडले आहे.
Chandwad-Deola | मंत्रीपदाची अशी हाव की भावाच्याच पाठीत घातला घाव..?
केदा आहेरांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर हे इच्छुक उमेदवार असून, या अनुषंगाने आहेर यांनी गेल्या वर्षभरापासून दोन्ही तालुक्यातील मतदारांच्या गाठी भेटी घेऊन उमेदवारीची तयारी केली आहे. असे असतांना नुकत्याच भाजपाच्या पहिल्या यादीत डॉ. राहुल आहेर यांचे नाव आल्याने व इच्छुक उमेदवार आहेर यांना डावलण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. केदा आहेर यांना उमेदवारी नाकारल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी राजीनामा अस्त्र उगारल्यामुळे दोन्ही तालुक्यात भाजप अडचणीत सापडला असून मंगळवारी देवळा नगरपंचातीच्या नगराध्यक्षा भाग्यश्री पवार, उप नगराध्यक्ष मनोज आहेर, गटनेता संजय आहेर, नगरसेवक जितेंद्र आहेर, भूषण गांगुर्डे, कैलास पवार, करण आहेर, अशोक आहेर, सुलभा आहेर, भारती आहेर, सुनंदा आहेर, अश्विनी चौधरी, रत्ना मेतकर, राखी भिलारे, शीला आहेर, योगेश आहेर, हितेश आहेर यांनी आपल्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने पक्षाला मोठा धक्का पोहचला आहे, त्यात काल बुधवार दि. २3 रोजी केदा आहेर यांनी आयोजित केलेल्या संवाद मेळाव्यात देवळा बाजार समितीचे उप सभापती सह अन्य सर्व संचालकांनी राजीनामे देऊन आपला पाठिंबा दर्शविला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम