Deola | देवळा नगरपंचायतीच्या वतीने मतदान जनजागृती मोहिम

0
4
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकरी जलज शर्मा यांच्या निर्देशानुसार, देवळा शहरात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दि. १९ रोजी मतदान जनजागृती मोहिम राबविण्यात आली. ११८-चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघा अतंर्गत मतदार जनजागृतीचा भाग म्हणून देवळा शहरात स्वीप कार्यक्रमांतर्गत शनिवारी येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात मतदान जनजागृती करण्यात आली.

Deola | वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबीर; आहेर कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम

मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा- मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर

यावेळी देवळा नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक अजय बच्छाव, मतदान नोंदणी अधिकारी सुरेश आहेर, शशिकांत मेतकर, सुनील शिलावट, वसंत आहेर, नाना आहेर, किरण गुजरे आदींसह महाविद्यालय शिक्षक उपस्थित होते. तसेच देवळा शहरात दर रविवारी आठवडे बाजारात, स्थानिक इतर आजुबाजुच्या गावातून आलेले व्यापारी, फळ-भाजी विक्रेते, मटण मार्केट विविध गर्दीच्या ठिकाणी सेल्फी पॉइंट व स्वाक्षरी मोहीमेद्वारे नगरपंचायतीच्या वतीने मतदान जनजागृती करण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांचा लोकशाहीमध्ये सहभाग वाढावा, मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी यावेळी केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here