सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | पिंपळगाव (वा.) मविप्रच्या जनता विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संगीता आहेर होत्या. प्रभारी पर्यवेक्षक अशोक खैरनार, वैशाली निकम, रवींद्र निकम, सुनीता आहेर, चंद्रशेखर चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थी दीक्षा वाघ, कृष्णा सावकार यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. प्राचार्या संगीता आहेर यांनी डॉ. अब्दुल कलाम यांनी केलेल्या कार्याची माहिती देत सर्वांनी त्यांचा कार्याचा आदर्श घेऊन जीवनात उच्च ध्येय ठेवून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा असे मत व्यक्त केले.
Deola | देवळा जिजामाता कन्या विद्यालयात आकाश कंदील कार्यशाळेचे आयोजन
वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांनी पुस्तक वाचन केले
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने प्राचार्य, विद्यार्थी व शिक्षकांनी पुस्तकांचे वाचन केले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समिती प्रमुख रवींद्र निकम, रोहिणी आहेर, सरोज जाधव, ग्रंथपाल भारती देवरे, जयश्री बिरारी, पवन निकम व समिती सदस्यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ऋतुजा वाघ, समृद्धी पाटील यांनी तर आभार शितल देवरे यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम