सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांनी आपले चुलत बंधू केदा आहेर यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीतून माघार घेऊन पक्षश्रेष्ठींकडे आपल्या बंधूला उमेदवारी मिळण्याची विनंती केल्याची माहिती चांदवड येथील पत्रकार परिषदेत दिल्याने देवळा तालुक्यातील जनतेने अखेर श्वास मोकळा केला.
निवडणुकीच्या दीड वर्ष आधीपासूनच केदा आहेरांनी सुरू केली होती तयारी
विधानसभा निवडणूक लागण्याच्या आधीपासून भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष केदा आहेर यांनी यंदाच्या म्हणजेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आपणच उमेदवारी करणार असून त्या दृष्टीने गेल्या वर्षभरापासून तयारी सुरू केली होती. चांदवड व देवळा तालुक्यात त्यांनी कार्यकर्त्यांचा जनसंपर्क वाढवून हजारो महिलांच्या मेळावे घेत विविध स्पर्धातून आकर्षक बक्षीसांच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली. तसेच नवरात्र उत्सव गणेश उत्सवात तरुण मंडळींना प्रोत्साहन देत विविध उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांचा मोठा संच चांदवड-देवळा तालुक्यात निर्माण केला.
वारकरी संप्रदायाच्या गाव-गावच्या भजनी मंडळांना एकत्रित करत गाव तेथे भजनी मंडळ तयार करून त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी भजनासाठी लागणारे साहित्य सुमारे १८० गावातील भजनी मंडळांना एकत्रित करत वाटप करून जनसंपर्कात अग्रेसर राहिले. ते यावरच थांबले नाही तर देवळा तालुक्यातील सर्व पक्ष नेत्यांना गाव पातळीवर एकत्र करीत खेड्यापाड्यातून मेळाव्याद्वारे एकमुखी पाठिंबा मिळवत त्यांनी आपला प्रचार सुरू ठेवल्याने मतदारसंघात आचारसंहिता लागण्यापूर्वीच प्रचारात आघाडी घेतल्याने सर्वत्र त्यांच्या नावाची चर्चा होऊन एक प्रकारे त्यांनी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर मौन बाळगून असल्याने दोन्ही तालुक्यातील जनतेत संभ्रम होता.
Deola | श्री. बालाजी पतसंस्थेचे कामकाज कौतुकास्पद; सी. ए. महेश मुंदडा
कार्यकर्त्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता
यावर डॉ. राहुल आहेर की केदा आहेर उमेदवार याबाबत रोजच उलट सुलट चर्चा सुरू होत्या. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. नात्यागोत्याला देखील ही निवडणूक कशी होईल याकडे लक्ष लागून होते. या सर्व विषयांवर निवडणूक जवळ आली असतानाच जनतेचा संभ्रम दूर होण्याकामी डॉ. राहुल आहेर यांनी दि. १७ रोजी चांदवड येथे पत्रकार परिषद घेऊन आपण केदा आहेर यांच्यासाठी या निवडणुकीतून माघार घेत असून केदा आहेर यांच्या उमेदवारीची शिफारस भाजपा पक्षश्रेष्ठींकडे केली असल्याची माहिती दिल्याने कार्यकर्त्यांनी आपला श्वास मोकळा केला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम