सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | मेशी ता. देवळा येथील अवघ्या अठरा महिन्याची चिमुकली हेमांशी महेंद्र आहिरे हिचा दसऱ्याच्या दिवशी शनिवारी दि. १२ रोजी दुपारी २ वाजता घरासमोरील पाण्याच्या खड्डयात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने संपूर्ण गावांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आज दुपारी दोन वाजता घडली घटना
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मेशी ता. देवळा येथे ऐन दसऱ्याच्या दिवशी शनिवारी दि. १२ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास हेमांशी महेंद्र आहिरे (१८ महिने) हिचा खेळतांना घरासमोरील पाण्याच्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने मेशी गावं व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .तिच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. प्रगतीशील शेतकरी महेंद्र आहिरे यांची ती कन्या होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम