सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | येथे रविवारी दि. 06 रोजी दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ कराड यांनी देवळा तालुका शाखेस भेट दिली. यावेळी तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधु-भगिनींचे प्रश्न त्यांनी समजुन घेतले. सर्वांच्या शंकाचे निरसन त्यांनी केले. याप्रसंगी संघटनेचे गुणवंत शिक्षक संदिप शिरसाठ व प्रविण गुंजाळ यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्तविक आधार पानसरे यांनी केले. आरोग्य विस्तार अधिकारी राजेश निकुंभ, संदिप शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले.
Deola | अब्दुल सत्तार यांच्या निषेधार्थ देवळा बाजार समिती कडकडीत बंद
जिल्हाध्यक्षांनी केले पुढील वाटचाली विषयी सखोल मार्गदर्शन
जिल्हाध्यक्ष सोमनाथ कराड यांनी दिव्यांगातून होणाऱ्या सर्व पदोन्नत्या, त्यासाठी संघटनेने केलेली भरीव मदत, संघटनेची यापुढील वाटचाल याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी सुरेश आहेर, प्रविण गुजांळ, देसले मॕडम, काळे आदी सभासद उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम