सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | चांदवड येथे मंगळवारी दि. १ रोजी युवा नेते केदा नाना आहेर यांच्या संकल्पनेतून भव्य महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यातून जवळपास एक हजार ३५८ युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली. मेळाव्यासाठी नाशिक जिल्हा तसेच महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने युवक-युवती उपस्थित झाले होते. या भव्य रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी आमदार डॉ. राहुल आहेर उपस्थित होते. चांदवड देवळा तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील तरुणांनी या रोजगार मेळाव्यात मुलाखतीतून नशीब आजमावले. या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ५५ ते ६० कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यात बॉश, टाटा, एसबीआय, वोडाफोन एअरटेल याशिवाय असंख्य नामवंत कंपन्याचा सहभाग होता.
Deola | देवळा पब्लिक स्कूलच्या बाॅलबॅडमिंटन संघाची विभागीय स्तरावर निवड
रोजगार मेळाव्याला तरुणांकडून चांगला प्रतिसाद
या रोजगार मेळाव्यासाठी सुमारे तीन हजार उमेदवारांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले होते. मुलाखत प्रक्रियेमध्ये एकूण २ हजार ४२२ उमेदवारांनी आपला सहभाग नोंदवला. दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष प्राधान्य होते. या मेळाव्यातून १ हजार ३५८ पदांची नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली. नोकरीमध्ये रस नसलेल्या उमेदवारांसाठी व स्वयंरोजगार निर्मिती करणाऱ्या युवकांसाठी प्रसिद्ध Youtube प्रोग्रामर व इन्स्टा प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या प्रसिद्ध स्टार उपलब्ध करून देण्यात आले व त्यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी स्वयंरोजगार महामंडळाचे अधिकारी यांनी कर्ज योजना संदर्भात मार्गदर्शन केले. यात १३५८ उमेदवारांची निवड करण्यात येऊन त्यांना लगेच नियुक्तीपत्र देण्यात आले. ज्या उमेदवारांची निवड झाली नाही त्यांना मान्यवराच्यांच्या हस्ते जॉब कार्डचे वाटप करण्यात आले.
“20 टक्के राजकारणाने 80 टक्के समाजकारण हा माझा मानस” – केदा आहेर
यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याने आयोजक केदा आहेर यांचे कौतुक केले व युवकांनी खचून न जाता सातत्य ठेवून अशाप्रकारच्या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन मुलाखतीस सामोरे जावे असे सांगितले. केदा आहेर यांनी “20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण हा माझा मानस असून या मेळाव्यात सर्वसामान्य लोकांच्या मुलांना नोकरी व्यवसाय मिळवून देत त्यांना समाजात सन्मानाने जगता येईल. युवकांचे सशक्तीकरण करणे, त्यांना आत्मनिर्भर करणे हे महत्त्वाचे असून युवकांच्या कल्याणासाठी असे अनेक उपक्रम यापुढे राबवले जातील” असा विश्वास त्यांनी व्यक्त करत निवड झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नामवंत प्रसिद्ध कंपन्यांच्या व्यवस्थापकानी रोजगार मेळाव्या संदर्भात मार्गदर्शन केले.
Deola | ग्रामविकास समितीचे अध्यक्ष संजय दहिवडकर यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले
यावेळी डॉ. आत्माराम कुंभार्डे, प्रशांत पाटील, वाल्मिक वानखेडे, प्रशांत ठाकरे, जगन गांगुर्डे, महावीर संकलेच्या, ताराचंद आहीरे, सुनील शेलार, प्रशांत आप्पा ठाकरे, प्रशांत वैद्य, महेंद्र कार्डिले, विनोद पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुरलीधर भामरे यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम