सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | देवळा तालुक्यात सप्टेंबर महिन्यात ८४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपले असून बुधवार (दि.२५) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने शेकडो एकर क्षेत्रावरील मका भुईसपाट झाला तूर, सोयाबीन बरोबर, महागडे कांदा बियाणे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Deola | अटल भूजल योजनेचे ग्रामस्थरावरील प्रशिक्षण महात्मा फुले नगरमध्ये संपन्न
परतीच्या पावसाने झोडपले
तालुक्यात तीन ते चार दिवसांपासून परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला असून काढणीला आलेल्या शेती पिकांचे नुकसान झाले असून सर्व दूर झालेल्या या पावसामुळे नदी, नाले दुथडी वाहू लागल्याने पूर्व भागातील पाणी टंचाई दूर झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी दि. २५ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने शेतात उभा असलेला मका भुईसपाट झाला. झाडे उन्मळून पडली. वीजपुरवठा खंडित झाला. गुरुवारी ही पावसाने हजेरी लावल्याने लोकांची शेतकऱ्यांनी तारांबळ उडाली.
नुकसानीमुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात
तालुक्यातील पश्चिम भागात पावसामुळे कोलथी नदीचा प्रवाह वाढला असून, हे पाणी थेट किशोर सागर (रामेश्वर धरणात) मध्ये गेल्याने सांडव्याच्या पाण्यात वाढ झाली आहे. दुसरीकडे या पावसामुळे महागडी कांद्याचे बियाणे वाया जाणार असल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करण्यात यावा व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Deola | रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना ९ % लाभांश- चेअरमन विनोद शिंदे
मंडळ निहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे :
*देवळा मंडळ- (दि.२४) ४.० मिमी. (दि.२५) ३.८ मिमी. (दि.२६) २८.३ मिमी.
*लोहोणेर मंडळ- (दि.२४) ११.८ मिमी .(दि.२५) २.५ मिमी . (दि.२६) ३३.० मिमी.
*उमराणे मंडळ – (दि.२४) ४४.३ मिमी .(दि.२५) १६.३ मिमी. (दि.२६) २४.८ मिमी
*खर्डे मंडळ – (दि.२४) ३५.५ मिमी . (दि.२५) ४.५ मिमी. (दि.२६) ४८.३ मिमी.
“अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे फोटो पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनी पिक विमा इन्शुरन्स कंपनी कडे ( corp insurance) ॲपवर तक्रार नोंदवावी.”
– चंद्रशेखर अकोले ,प्रभारी तालुका कृषी अधिकारी, देवळा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम