सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | यशदा पुणे मित्रा मार्फत अटल भूजल योजनेचे ग्रामस्तरावरील प्रशिक्षण तालुक्यातील महात्मा फुलेनगर (खारीपाडा) येथे संपन्न झाले. या प्रशिक्षणात शेतकरी उत्पादक कंपनी, शेतमाल उत्पादन आणि बाजारपेठ जोडणी, सामूहिक शेती, शेतकऱ्यांचे गट, शेतकऱ्यांची कंपनी त्यांची नियमावली व त्यांचे फायदे पुढील काळात शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सामूहिक शेती कशी फायदेशीर ठरणार याविषयी सविस्तर मार्गदर्शन प्रशिक्षक विष्णू शेवाळे, सहाय्यक प्रशिक्षक रेणुका शेवाळे यांनी केले.
Deola | रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना ९ % लाभांश- चेअरमन विनोद शिंदे
बचत गटातील महिला आणि शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली
यावेळी सरपंच सविता गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य किशोर जाधव, युवराज जाधव, कल्पेश गांगुर्डे, अनिल अहिरे, शिवाजी शिरसाठ, हरीभाऊ जाधव, संतोष अहिरे, रोशन शिरसाठ, तुकाराम पगार, सीआरपी मीना थोरात, पूजा अहिरे, पशुसखी रूपाली अहिरे, ग्रामसंघ अध्यक्ष नीलिमा गांगुर्डे आदींसह बचत गटातील महिला सदस्य, शेतकरी आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम