Deola | देवळा येथे श्री बालाजी व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ

0
16
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या श्री बालाजी व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ सोमवारी (दि २७) रोजी सायंकाळी 4 वाजता प.पु. स्वामी दिनेशगिरी महाराज (निळकंठेश्वर आश्रम, सावकारवाडी) यांचे शुभाशिर्वादाने व डॉ.श्री. विजय सुर्यवंशी (आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क) यांचे शुभहस्ते यांचे शुभहस्तेआहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाफेडचे नूतन राज्य संचालक मा. केदा आहेर, आ. डॉ. राहुल आहेर, कॅप्टन निलेश गायकवाड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.(Deola)

तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती अरुण आहेर, सहायक निबंधक अनिल देवकर ,बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, मविप्र संचालक विजय पगार, नगराध्यक्षा भाग्यश्री पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील आहेर, देमकोच्या चेअरमन कोलम कोठावदे, नगरसेवक जितेंद्र आहेर, संस्थेचे मार्गदर्शक अंबादास अहिरराव, डॉ. व्ही एम निकम, प्राचार्य हितेंद्र आहेर, डॉ वसंतराव आहेर, सतिष राणे, जसराज सुराणा, अशोक सुराणा, सनदी लेखापाल महेश मुंदडा उपस्थित राहणार आहेत.

Deola | देवळा तालुक्याला प्रथमच एवढे मोठे पद; केदा आहेर यांचे जल्लोषात स्वागत

त्या निमित्ताने संस्था कार्यालयात श्री सत्यनारायण पूजा आयोजित केलेली आहे. यावेळी सभासद, हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन पवन अंबादास अहिरराव, व्हा. चेअरमन मोईनुद्दीन सांडुभाई पठाण, मानद कार्यकारी संचालक नितीन रघुनाथ शेवाळकर, संचालक सर्वश्री दत्तात्रेय देवरे, डॉ. श्री. पंकज निकम, धनंजय आहेर, निखील आहेर, प्रविण अलई, योगेश शेवाळे, ज्ञानेश्वर साबळे, धनंजय राजवाडे, सौ. वंदना आहेर, सौ. सुषमा खरोटे, विजय आहेर, वैजनाथ देवरे, शांताराम निकम यांनी केले आहे.(Deola)

दरम्यान, यावेळी केदा आहेर यांची नाफेडच्या नूतन राज्य संचालक पदी निवड झाल्याने संस्थेच्या वतीने सायंकाळी साडे चार वाजता सुभाष रोड देवळा येथे त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Deola | केदा आहेर यांची नाफेडच्या राज्य संचालक पदी निवड


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here