सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा येथील ‘सुनिल आहेर खाजगी कृषी’ मार्केटच्या वतीने तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यात नगराध्यक्षा भाग्यश्री पवार,
माजी नगराध्यक्षा सुलभा आहेर, देवळा तालुका शेतकरी खरेदी – विक्री संघाचे चेअरमन संजय गायकवाड, व्हा. चेअरमन अर्चना आहेर, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सोमनाथ जगताप, संपर्क प्रमुख विनोद देवरे, कार्याध्यक्ष दिनेश सोनार, संजय देवरे, सुवर्णकार भगवान खरोटे यांचा सन्मान करण्यात आला.
Deola | वाजगांव येथे प्रथमच अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना पुरस्काराच्या स्वरूपाने जेव्हा दखल घेतली जाते तेव्हा आपल्या कार्याचा अभिमान वाटतो आज मार्केटच्या वतीने आमचा जो सन्मान केला त्यामुळे आम्हाला सामाजिक कार्य करण्यासाठी आमचे पंख अधिक बळकट होतील असे नगराध्यक्षा भाग्यश्री पवार यांनी म्हटले. सुनिल आहेर खाजगी मार्केटच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात आजचा आमचा सन्मान देखील नाविन्यपूर्ण आहे विशेषतः यात पत्रकार बांधवांचा सन्मान देखील केला आपण केलेल्या सन्मानामुळे आम्हास काम करण्याची नवीन ऊर्जा मिळाली असे संजय देवरे यांनी सांगितले.
Deola | देवळा येथील विकास कामांसाठी 2 कोटी रुपये मंजूर
आपल्या भागात अनेक मान्यवर नवीन संस्थेवर नियुक्त होतात तसेच विविध मान्यवरांना पुरस्कार दिले जातात या सगळ्यांचा आपण देखील सन्मान करून त्यांना पाठबळ दिले पाहिजे या हेतूने ‘हा सन्मान सोहळा आयोजित केल्याचे मार्केटचे संचालक सुनिल आहेर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर खरोटे यांनी केले याप्रसंगी जि. प. च्या माजी सदस्या डॉ. नुतन आहेर, सुनिल आहेर मार्केटचे संचालक प्रफुल्ल आहेर, संचालक ललित निकम, धनंजय देवरे, आनंद भुतडा, अनिल पगार, गोटू देवरे, दिपाली देवरे, किरण आहेर, मयुर आहेर, भुषण पवार, सतिष कचवे आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम