सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | कणकापूर (ता. देवळा) येथे श्री संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाच्या बीजे प्रित्यर्थ तीन दिवशीय अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ह.भ.प प्रा. भगवान महाराज शिंदे यांनी दिली. याठिकाणी वै. सचितानंद हभप ब्रह्मलीन गंगाधर महाराज, वै. ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज शेळके यांच्या कृपाशीर्वादाने व ह.भ.प गुरुवर्य निवृत्तीनाथ महाराज काळे यांच्या मार्गदर्शनाने हा महोत्सव पार पडणार असून, या महोत्सवात अनेक विद्वान व विचारवंतांची कीर्तने व प्रवचने होणार आहेत.
- सोमवार (दि. 25) रोजी रात्री कीर्तन केसरी ह.भ.प तात्या महाराज शिंदे (भुईगव्हान),
- मंगळवार (दि 26) रोजी रामायणाचार्य ह.भ.प राजेंद्र महाराज पाटील (दह्याने)
- बुधवार (दि 27) रोजी ह.भ.प नंदू महाराज गांगुर्डे (शेरी)
- गुरुवारी (दि 28) रोजी गुरुवर्य ह.भ.प निवृत्तीनाथ महाराज काळे (गुरुदेव संस्थान विजयनगर)
यांचे सकाळी ९ वाजता काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. या सप्ताहात अनेक नामवंत गायक व वादक व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पंचक्रोशीतील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा कीर्तनकार प्रा. ह.भ.प भगवान महाराज शिंदे यांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम