Deola | देवळा येथे महाशिवरात्री निमित्ताने भाविकांना प्रसाद, आणि महिलांना पर्स वाटप 

0
11
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | महाशिवरात्री तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देवळा येथील केदा नाना आहेर व सुभाष रोड गणेश मित्र मंडळाच्या वतीने भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित महिलांना पर्स वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. महाशिवरात्री निमित्ताने देवळा शहरातील मुंजोबा पारावर असलेल्या शिव लिंगच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणवर गर्दी केली होती.

Deola | देवळा नगरपंचायतीच्या नवीन इमारतीसाठी १० कोटींचा निधी मंजूर

यानिमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना केदा नाना आहेर व सुभाष रोड गणेश मित्र मंडळाच्या वतीने खिचडीचे वाटप करण्यात आले. तसेच महिलांना पर्सचे वाटप करून महिला दिन साजरा केला. यावेळी जेष्ठ नगरसेवक जितेंद्र आहेर, गटनेते संभाजी आहेर, भाजपचे तालुका अध्यक्ष व मंडळाचे अध्यक्ष अतुल पवार, माजी उपनगरध्यक्ष अशोक आहेर, तुषार सोनवणे आदी उपस्थित होते. याकामी मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे सराव स्तरावरून कौतूक होत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here