सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | एस.के. डी. चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक संचलित एस. के. डी. इंटरनॅशनल स्कूल व व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भावडे येथील विद्यार्थ्यांनी मागील दहा वर्षाची परंपरा कायम राखत, देवळा येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी कळवण रोड ते पाच कंदील येथे भव्य मिरवणूक काढली. मिरवणुकी प्रसंगी विद्यार्थ्यांनी केलेले लेझीम नृत्य, लाठीकाठीच्या कसरतींनी देवळा परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
Deola | रौद्रशंभु ट्रेकर्सकडून गेल्या पाच वर्षांपासून गडकिल्ले संवर्धन करून शिवजयंती साजरी
विद्यालयाच्या वतीने शिवस्मारकाचे पूजन करून विद्यार्थ्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांची आरती, महाराष्ट्र गीत गाऊन कार्यक्रमाचा उत्साह वाढविला. या प्रसंगी विद्यालयाच्या सांस्कृतिक व पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख शोभा जाधव यांनी शिवरायांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य एस. एन. पाटील , एन. के. वाघ, क्रांती सूर्यवंशी , क्रीडा शिक्षक मुद्दर सय्यद जमील,धनंजय परदेशी, यज्ञेश आहेर,अक्षय गवळी, सुशांत बागुल, पंकज चेतलापल्ली, राजू देवरे, मंगल सिंह, संगीत शिक्षक रतन भोईर, बबलू देवरे, विजू देवरे, सागर कैलास उपस्थित होते . विध्यार्थ्यानी उत्कृष्ट सादरीकरन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, सचिव मीना देवरे यांनी कौतुक केले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम