सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा-नाशिक रस्त्यावरील देवळा तालुक्यातील रामेश्वर फाटा येथे सुरू असलेल्या ‘देवळा पोमोग्रेनेट ऍग्रो प्रोड्युसर’ कंपनीच्या बांधकामाच्या ठिकाणाहून सोमवारी रात्री (दि. १९) रोजी अज्ञात चोरट्यांनी कोटिंगचे ५७ पत्रे चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत संबंधित कंपनीच्या संचालकांनी देवळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील देवळा-नाशिक रस्त्यावर रामेश्वर फाटा येथे ‘देवळा पोमोग्रेनेट ऍग्रो प्रोड्युसर’ नामक कंपनीच्या नवीन शेडचे बांधकाम सुरू असून, यासाठी कंपनीच्या संचालकांनी एकूण ९७ कोटींग पत्रे खरेदी केली होते. या कामाच्या ठिकाणावरून शिवजयंतीच्या दिवशी सोमवारी (दि. १९) रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी यातील अंदाजे ८० हजार रुपये किंमतीचे तब्बल ५७ पत्रे चोरून नेल्याची घटना घडली आहे.(Deola)
Deola | रौद्रशंभु ट्रेकर्सकडून गेल्या पाच वर्षांपासून गडकिल्ले संवर्धन करून शिवजयंती साजरी
गुंजाळ नगर येथील प्रगतशील शेतकरी व देवळा बाजार समितीचे संचालक योगेश देवाजी गुंजाळ यांच्या रामेश्वर फाटा येथील शेतात या कंपनीच्या नवीन शेडचे काम हाती घेतले असून, शेडच्या कामालगत राहणारे ह्या कंपनीचे संचालक सोमवारी कामानिमित्त बाहेर गावी गेले असल्याचा तसेच याठिकाणी कोणी नसल्याचा व अंधाराचा फायदा घेत या चोरट्यांनी येथून कोटींगचे ५७ पत्रे चोरी केल्याचे आज मंगळवारी (दि. २०) रोजी सकाळी लक्षात आले.(Deola)
Deola | देवळा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी संजय गायकवाड यांची निवड
ह्या घटनेची माहिती संचालक गुंजाळ यांनी कंपनीचे वाजगाव येथील अध्यक्ष बापू देवरे यांना सांगितल्या नंतर त्यांनी या घटनेची माहिती देवळा पोलिसांना कळविली आहे. देवळा तालुक्यात छोट्या मोठ्या चोरीच्या घटना वारंवार घडत असून, गेल्या महिन्यात देवळा शहरात पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर स्वामी समर्थ मंदिरात चोरी झाली होती. या घटनेचा अद्याप उलगडा होत नअसून ही घटना ताजी असतानाच पुन्हा रामेश्वर फाट्यावर पत्रे चोरीला गेल्याची घटना घडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. देवळा तालुक्यात सद्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, यामुळे चोरीच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (Deola)
Deola | असे आहे संचालक मंडळ
- बापुसाहेब सुखदेव देवरे
- जगदीश नानासाहेब शिंदे
- बापू आहेर
- सीमा रवींद्र जाधव
- शितल योगेश गुंजाळ
- अंकुश खेमराज सोनवणे
- सरला यशवंत देवरे
- सतिश हिरामण जाधव
- लक्ष्मण माळी
- मुकेश भदाणे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम