सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | आमदार डॉ. राहुल आहेर यांनी आपल्या मतदारसंघातील दिंडीतील भाविकांसमवेत गुरुवारी दि. २३ रोजी महिरावणी येथे रात्री जेवणाचा आस्वाद घेऊन भक्तिमय शुभेच्छा दिल्या. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे उद्या शनिवारी दि. २५ रोजी भरणाऱ्या श्री संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव निमित्ताने जिल्हाभरातून निघालेल्या पायी दिंड्या शुक्रवारी दि. २४ रोजी विसवल्या असून, सालाबादप्रमाणे याही वर्षी देवळा तालुक्यातून बहुतांश गावातून भाविकांनी त्रंबकेश्वर येथे पायी दिंडीने प्रस्थान केले आहे. या दिंडीतील भाविकांना दिंडी मार्गावर अनेक अन्नदाते अन्नदान करतात.
Deola | देवळा येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
यात देवळा चांदवड मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर हे देखील आपल्या महिरावणी येथील फार्महाऊसवर मतदारसंघातील दिंडीतील भाविकांना जेवणाची सुविधा उपलब्ध करून देतात. गुरुवारी दि. २३ रोजी रात्री आठ वाजता देवळा तालुक्यातील श्री क्षेत्र विठ्ठल मंदिर रामेश्वर (कापशी) येथील पायी दिंडीतील भाविकांना महिरावणी येथील फार्महाऊसवर भेट घेऊन त्यांच्या समवेत जेवणाचा आस्वाद घेत भक्तिमय शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित भाविकांनी आमदार आहेर यांच्या सामाजिक बांधिलकी बद्दल समाधान व्यक्त केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम