सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे शुक्रवार (ता.२४) रोजी सकाळी ठीक दहा वाजता तलाठी कार्यालय सेतू ठिकाणी शेतकरी ओळखपत्र फार्मर आयडी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त शेतकरी ओळखपत्र योजने संदर्भात मंगळवारी इगतपुरी तहसीलदार कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत तहसीलदार अभिजित बारावकर, निवासी नायब तहसीलदार धनंजय लचके, मंडळ अधिकारी रुपाली साळवे, तलाठी सचिन कराते, कृषी सहाय्यक जयश्री गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, सेतू संचालक दिलीप बांबळे, संतोष आव्हाड आदींसह बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते. केंद्र सरकारद्वारे फार्मर आयडी तयार करण्याचे कामकाज सुरू करण्यात आले असून या अनुषंगाने इगतपुरी तालुक्यातील सर्व मंडळ स्तरावर शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अभिजित बारावकर यांनी बैठकीत सांगितले आहे. तरी तालुक्यातील सर्वच शेतकरी बांधवांनी शासनामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी एकच फार्मर आयडी करून घ्यावा असे आवाहनही शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम