सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी (दि. ५) रोजी उन्हाळी कांदा विक्रीसाठी दाखल झाला असून, या कांद्याला सर्वाधिक २२०१ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. या हंगामात प्रथमच देवळा बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा विक्रीसाठी दाखल झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी सतीश आहेर यांच्या वाहनाचे पूजन करून शेतकरी आहेर यांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. आहेर यांनी जवळपास ६० क्विंटल कांदा विक्रीसाठी आणला होता. दरम्यान, जिल्ह्यात अजून काही ठिकाणी उन्हाळी कांद्याची लागवड सुरु आहे. देवळा तालुक्यात जवळपास जानेवारी अखेर कांद्याची लागवड पूर्ण झाली आहे.
Deola | देवळा शहरात दामिनी पथकाची धडक कारवाई; टवाळखोरांना दणका
सध्या लाल कांद्याची आवक अजून पर्यंत टिकून आहे. तालूक्यात प्रथमच या हंगामातील उन्हाळी कांदा विक्रीसाठी देवळा बाजार समितीमध्ये दाखल झाल्याने संबंधित शेतकऱ्याचे कौतुक करण्यात येत आहे. यावेळी सभापती योगेश आहेर, उपसभापती शिवाजी आहिरे, संचालक भाऊसाहेब पगार, विजय सोनवणे, अभिमान पवार, शिवाजी पवार, अभिजित निकम, धनश्री आहेर, विशाखा पवार, दिलीप पाटील, दीपक बच्छाव, शाहू शिरसाठ, रेश्मा महाजन, भास्कर माळी, शीतल गुंजाळ, संजय शिंदे, निंबा धामणे, भावराव नवले आदींसह कर्मचारी, व्यापारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम